Total Pageviews

Sunday, February 1, 2009

'सुनामी आली ! सुनामी आली !!'

एकदा काय झालं,
एक सरिता रागवली
आपल्या boyfriend ला म्हणाली

'हे रे काय सागर !
मीच का म्हणून ?

दर वेळी मीच का
मीच का यायचं खाली डोंगरावरून ?
आणायचं रानावनातलं सारं तुझ्यासाठी
दरी बघायची नाही
कडा बघायचा नाही
कशी सुसाट पळत येते मी
विरहव्याकुळ, संगमोत्सुक
कधी एकदा तुला गच्च मिठी मारीन
तुझ्यात हरवून , हरपून जाईन

आणि तू वेडा
तुझं लक्षच नसतं कधी
सारखा त्या चंद्रिकेकडे टक लावून असतोस.
उसळतोस तिच्यासाठी
तुझ्यासाठी पाणी आणते मी
पण तुला भरती येते तिच्यासाठी

मी नाही जा !
बोलणारच नाही आता.
येणारही नाही.
काठावरच्या लोकांना सांगून
मोट्ठं धरण बांधीन
थांबून राहीन तिथेच.
बघच मग.

सरिताच ती
बोलल्याप्रमाणे वागली.
सागर बिचारा तडफ़डला
आकसला, आतल्या आत झुरत गेला.
शेवटी फ़ुट्ला बांध त्याच्याही संयमाचा
उठला ताड
ओरडला दहाड
उफ़ाळला वारा पिऊन
लाटांचं तांड्व घेऊन
सुटला सुसाट
सरितेच्या दिशेने

लोक येडे.
म्हणाले 'सुनामी आली ! सुनामी आली !!

Saturday, January 24, 2009

भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...
हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया
त्या वेळी नाजुक भोळ्या, वार्‍याला हसवून पळती
क्षितिजांचे तोरण घेउन, दारावर आली भरती
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातिल जणू राघव शेला
देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळापाशी, मी उरला सुरला थेंब
संध्येतील कमल फुलासम, मी नटलो शृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने
स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे
ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

-- ग्रेस

ती पालवी...

- मनस्विनी लता रविंद्र

( सकाळचे आठ-साडेआठ वाजतात. तो अंथरुणातून उठून बसतो. शेजारी ती अजूनही गाढ झोपेत- तो तिला उठवू लागतो.)

तो : उठ... शोनड उठा... उठ उशीर होतोय... मी अर्ध्या तासात निघीन हं आवरून...

ती : एक दोन मिनिटं. दोन सेकंद प्लीज... माझे डोळेच उघडत नाहीयेत.

तो : नंतर माझ्यावर चिडचीड करायची नाही कळलं. मी माझं काम केलंय, तुला उठवायचं.

ती : अँू तू पण नको जाऊस, मी पण नाही जात. आपण दिवस लोळत काढू मस्त...

तो : आता आलीये तुला जाग... मी चहा ठेवतो तोपर्यंत उठ... ओके?

ती : (अंथरुणात उठून बसते. पण डोळे मिटलेलेच आहेत. त्याचा हात पकडून त्याला थांबवते.) मला काय दिसतंय सांगू? एक खूप मोठ्ठं कुलूप आहे... ज्याला गंज लागलाय... त्या कुलपाच्या छिदातून एक पालवी बाहेर आली आहे... आणि मग तू येतोस मागून सोबत... आशूदादा आहे... त्याचा दाद किडलाय म्हणून तो डेण्टिस्टच्या खुचीर्त बसलाय... आणि तू मात्र बरमुडा घालून हवाईयन पद्धतीचा शर्ट घालून शीळ घालत फिरतोयस... मी मागून येते तर डॉक्टरांनी आशूदादाचा दात काढलाय... तो खूप किडलाय... मी नाचत तुझ्याजवळ येतं आहे... आणि हत्ती... बापरे केवढा मोठ्ठा हत्ती... आशूदादा...

तो : मला रोज रोज स्वप्न नको सांगत जाऊस... सकाळी सकाळी एखादी अगम्य फिल्म बघितल्यासारखं वाटतं.

ती : (डोळे उघडते) ऊँ नको जाऊस नां... पण मला एक कळत नाहीये आशूदादाचा दात का किडलेला दिसला मला?

तो : तो किडका दात म्हणजे कुजलेल्या समाज व्यवस्थेचं प्रतीक असेल.. ज्यात राहून राहून तो कंटाळलाय... तो गेला नव्हता का सुट्टी काढून अभयारण्यात त्यामुळे तुला असं वाटलं असेल... ती सलणारी खुपणारी गोष्ट त्याने काढून टाकली.

ती : हूँ... म्हणूनच हत्ती पण दिसला मला... आणि तू हवाईयन कपड्यात... हं... तू हवाईयन कपड्यात दिसलास कारण मला असं सबकॉन्शसली वाटत असणार की आपण पण फिरायला जावं कुठेतरी...

तो : आपण जाऊ ना, पण त्यासाठी तुला दात घासून, आंघोळ करून तयार व्हावं लागेल...

ती : आणि ऑफिसला जावं लागेल... शी बाबा... एक दिवस आरामात जात नाही...

तो : असं तू रोज म्हणतेस आणि उशीर झाला की मला शिव्या घालतेस, मला थांबवलं का नाहीस बडबडीपासून...

ती : आज नाही घालणार.

तो : म्हणजे उशिरा जायचंय तुला ऑफिसला?

ती : नाही उलट साडेनऊला पोहोचायचं होतं...

तो : ओ शीट. मूर्ख - मूर्ख आहेस तू... आता कसं शक्य आहे तुला पोहोचवणं... तू तू दहा मिनिटात आवर. मी पटकन ऑम्लेट टाकतो. ते खा आणि... नाही नाही ट्रेनमध्येच खा...

ती : अरे मला उशीर झालाय आणि तू हायपर का होतोयस? ऐक ना...

तो : किती आरामात बोलते आहेस तू? हं, बोल पण पटकन...

ती : आशूदादा सुट्टी काढून अभयारण्यात फिरायला गेला, आपण एक सुट्टी काढून नॅशनल पार्कला जाऊ नये म्हणजे काय?

तो : नाही सुट्टी वगैरे शक्यच नाही.

ती : बिग डिल रे...

तो : तुला इतकं सोपं वाटतंय पण तसं नाहीये एक सुट्टी म्हणजे कळतंय तुला?

ती : भांडायचंय का आपण आता?

तो : मला नाही शक्य.

ती : का?

तो : नॅशनल पार्क नाही आवडत मला.

ती : मग कुठे मरीन ड्राइव्ह?

तो : नको.

ती : घरीच मस्त आराम करायचा?

तो : चालेल. पण कुलपातून पालवीचा काय अर्थ असेल???

( दोघं हसतात)

पावभाजी

- मनस्विनी लता रवींद्र
(रात्र पडली आहे. दोन जोडपी रेस्तराँमध्ये बसली आहेत. मेनूकार्ड समोर)
ऋतुजा : ए, मी पावभाजी घेणार.

तपन : नेहमी पावभाजी काय घेतेस, काहीतरी वेगळं ट्राय करना.

ऋतुजा : तुला रोकतेय का मी, हवं ते खा, नंतर अॅसिडीटी झाली तरीही मी काही बोलणार नाही.

अदिती : ए, चायनीज घ्यायचं?

नीतिन : नको.

अदिती : का रे? मी जे म्हणते त्याला नको म्हणतोस तू!

ऋतुजा : म्हणूनच विचारायचंच नाही. आपल्याला हवं ते घ्यायचं बस. विचारून भाव कश्याला द्यायचा यांना एवढा?

तपन : हो रे, ही मला भावच देत नाही. हिचे आणि माझे सगळे निर्णय हिच घेते.

ऋतुजा : तू निर्णय घ्यायला शंभर तास लावतोस.

अदिती : आमच्याकडे उलटंय, आम्ही निर्णयच घेत नाही. नितीन, काय खाणार आहेस तू?

नीतिन : मला ना काहीतरी वेगळं खायचंय. म्हणजे या पंजाबी जेवणाचा कंटाळा आलाय मला. आणि चायनीज तर हॉस्टेलमध्ये रोज खायचो मी. त्यामुळे नको झालंय.

ऋतुजा : ए लवकर ठरवा. भूक लागली आहे मला. तसंही उपाशी राहण्याचा अनुभव आलाय माझ्या वाट्याला.

तपन : दर वेळेस ते उपाशी राहणं काढलंच पाहिजे का?

अदिती : का गं? काय झालं होतं?

ऋतुजा : आमचं लग्न ठरलं ना, तेव्हा हा मला पहिल्यांदा बाहेर फिरायला घेऊन गेला आणि मी तेव्हा कसं, ओळखत नव्हते याला आणि शिवाय कसं असतं ना तेव्हा, चांगलं चांगलं प्रेझेण्ट व्हावसं वाटतं. तर मी एकदम शहाणी मुलगी बनून गप्प राहिले ग. मी कॉलेजमधून याच्या ऑफिसला गेले होते. तर हा मला फिरायला म्हणून याच्या मित्राकडे घेऊन गेला. तो मित्र म्हणजे वयाने मोठाय. या वयाचे मित्र असतात, हेच मला माहीत नव्हतं. त्याने फरसाण दिलं तर मी आधी नको म्हटलं. त्यानंतर परत कोणी मला विचारलंच नाही. मस्त हे दोघं गप्पा मारत बसले. बरं पहिल्यांदा एका मुलीला बाहेर नेतो आहेस तर खायला प्यायला घालायचं, पिक्चरला न्यायचं, पण हा बुद्धूराम आहे आमचा.

अदिती : तुमचं अरेंज मॅरेज आहे म्हणून निदान तुम्ही फिरायला तरी गेलात. इथे काय प्रेमात पडलो ना, बस की, अजून कश्याला काय करायला पाहिजे. आम्ही तर पिक्चर्स पण आपापल्या मित्रांबरोबर जाऊन बघतो.

नीतिन : पण मला काय वाटतं...

अदिती : हं?

तपन : हे लोक पंजाबी भाज्यांची ग्रेव्ही सकाळीच बनवून ठेवत असतील. रात्रीपर्यंत पार शिळी झाली असेल, ते मागवणं काही योग्यच नाही.

अदिती : बघितलंस, आपण एक बोलतोस आणि याच्या डोक्यात वेगळंच चाललंय.

तपन : ए, लवकर ठरवा काय हवं ते. माझा खरंतर फिश खायचा मूड होता.

अदिती : ए, मग आधी नाही का सांगायचंस?

तपन : हो, पण ऋतुजा नाही ना खात.

ऋतुजा : ए, पण तुला कधी टोकते का मी?

तपन : बघ बघ यातच किती दमदाटी भरलीये.

ऋतुजा : तू ना माझी पार खविस बायको अशी इमेज करतोस हं.

तपन : तू माझी तक्रार केलीस ती.

ऋतुजा : अच्छा... त्याचा बदला घेतो आहेस?

तपन : मी पण मागवतो पावभाजीच. काय करणार. नाही तर घरी जाऊन...

अदिती : ठीक आहे. मी पण तेच मागवते.

नीतिन : माझं एक ऑब्झवेर्शन आहे. अरेंज मॅरेज झालेल्या सर्व बायकांना नव-याबरोबर आठवड्यातून एकदा हॉटेलिंगला जायला आवडतं आणि बहुसंख्य बायका पावभाजीच खातात.

अदिती : हे काही खरं नाही. मी पण पावभाजी मागवते आहे पण आपलं अरेंज मॅरेज नाही.

तपन : पण तू दर वेळेस पावभाजी मागवतच नाहीस.

नीतिन : करेक्ट!

ऋतुजा : घ्या एकमेकांची बाजू. मला तर वाटतं, माझ्यापेक्षा तपनला नीतिनबरोबरच वेळ घालवायला आवडतो. बघ ना सतत त्यांच मित्रप्रेम जागं होत असतं.

अदिती : तेच तर नां. आपण ना मित्रांबरोबर जास्त एन्जॉय करू शकतो, हे नवरा-बायको झालं की भांडणंच वाढतात. हो ना रे नीतिन.

नीतिन : माझा निर्णय झालाय.

अदिती : काय? मला सोडतोयस की काय? कधी? नाही म्हणजे तसं सांग मला आधी, रिप्लेसमेण्ट शोधून ठेवीन.

ऋतुजा : ए-ए-ही रिप्लेसमेण्टची आयडिया चांगली आहे. मला मिळू शकेल गं दुसरं कुणी पण तपनला कोण मिळणार. माझा बुद्धूराम आहे ग तो!!!

तपन : रिप्लेसमेण्टच बघू नंतर... अरे नीतिन ठरलं का तुझं काय मागावयाचं ते?

नीतिन : मी... अं मी पावभाजी घेईन. तिही खडा पावभाजी. तुम्ही काय घेताय?

(सगळे हसतात आणि पावभाजीवर तुटून पडतात.)

असंही प्रेम असतं!!

असंही प्रेम असतं!!
असंही प्रेम असतं!!

अशाच एका संध्याकाळी,मन खुप जास्तच उदास झालं होतं....

काय करु? काहीच सुचतं नव्हतं...

उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात....

गेलो मग स्मशानात एकटाच!बसलो एका थडग्याजवळ जाऊन....

थडगे ताजे वाटत होते....मनात कुतूहल जागले....

थडग्यावरचे नाव वाचले...' महनाज़ खान ' '१९८६-२००७'...

म्हणजे माझ्याच वयाची असेल!

कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला?काय कारण असेल?

आजार? खून? का... का बाळंतपणात दगावली असेल ती?

मनात उगाच प्रश्नांचे काहूर उठले...

तेव्हढ्यात एक मुलगा त्या थडग्यावर फुले ठेवण्यासाठी आला....

मी त्याला विचारले ' तू भाऊ का तिचा?'

तो म्हणाला 'नाही, मी तो, ज्याच्यासाठी तिने आत्महत्या केली!'

मी विचारले ' आत्महत्येचं कारण?'

तो म्हणाला ' मला ब्लड कॅन्सर झालाय! २ आठवडे उरले आहेत फक्त!'

मी चकीत झालो!

विचारले ' मग तिने आत्महत्या का केली? तू जिवंत असतानाही?'

तो म्हणाला ' ती माझ्या स्वागताच्या तयारीसाठी पुढे गेली आहे!'

.......मी निशब्द....

असंही प्रेम असतं!!

Saturday, September 6, 2008

कणा

ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी,
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून,
गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून,
माहेर वाशीण पोरी सारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली,
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले,
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवीले,
कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे,
पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला,
मोडली आहे पाठ तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा...