Total Pageviews

Saturday, September 6, 2008

कणा

ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी,
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून,
गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून,
माहेर वाशीण पोरी सारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली,
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले,
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवीले,
कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे,
पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला,
मोडली आहे पाठ तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा...